NGN News
Latest Marathi News

अडीच लाख अपघात, 80 हजार व्यक्तींचा मृत्यू.. पाच वर्षांचा आलेख

नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या पाच वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गावर अडीच लाख अपघात होवून तब्बल 80 हजार व्यक्तींचा मृत्यू तर 2.3 लाख व्यक्ती जखमी झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या 2020-24 च्या अपघात तसेच नुकसानीवरील अहवालात अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

अहवालानुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात, देशातील राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीतून सुमारे 85,000 कोटी रुपये कमावले गेले. तरीही देशातील 1.46 लाख किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गापैकी 20 टक्के अर्थात 29,200 किमी राष्ट्रीय महामार्ग 80-100 किमी/ताशी वेगाने प्रवास करण्यासाठी असुरक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याला खराब रस्ते आणि अरुंद वळणे ही प्रमुख घटक कारणीभूत आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालय आणि आयआयटी दिल्ली यांनी 2024 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, 75.2 टक्के अपघात अतिवेगाने, 2.5 टक्के दारू पिऊन गाडी चालवल्याने आणि 10 टक्के तांत्रिक बिघाडांमुळे (खड्डे, खराब सिग्नल, तुटलेले डिव्हायडर) झाले आहेत. गेल्या ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गावर २.५ लाख अपघात झाले. यात ८० हजार मृत्यू, २.३ लाख जण गंभीर जखमी झाले.

महाराष्ट्रात 3000 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात सोळाशे किमीचे रस्ते खराब आहेत. गेल्या पाच वर्षात 8000 जणांचे अपघात झाले असून 3000 जणांचा मृत्यू झाला आहे. तर7,500 जण जखमी झाले आहेत. तर, या महामार्गावर 8000 टोल आकारण्यात आला.

Comments are closed.