लासलगाव : राकेश बोरा
देशातील दोन प्रमुख श्रद्धास्थळं – श्री साईबाबा यांचे शिर्डी आणि श्री वेंकटेश्वर स्वामी यांचे तिरुपती – यांना थेट रेल्वेने जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम रेल्वेच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज हजारो भाविकांची वर्दळ असते, त्यामुळे आता रेल्वेने भक्तांसाठी विशेष साप्ताहिक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण १८ विशेष गाड्यांची घोषणा
साईनगर शिर्डी ते तिरुपती आणि तिरुपती ते शिर्डी अशा दोन्ही दिशांना प्रत्येकी ९ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या साप्ताहिक गाड्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत धावणार आहेत.
गाड्यांचे वेळापत्रक:
गाडी क्र. 07638 – शिर्डी ते तिरुपती:
दर सोमवार, ०४ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत, रात्री १९.३५ वाजता साईनगर शिर्डी येथून सुटणार आणि तिसऱ्या दिवशी ०१.३० वाजता तिरुपती येथे पोहोचणार.
गाडी क्र. 07637 – तिरुपती ते शिर्डी:
दर रविवार, ०३ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत, पहाटे ०४.०० वाजता तिरुपतीहून प्रस्थान करणार आणि दुसऱ्या दिवशी १०.४५ वाजता शिर्डी येथे पोहोचणार.
प्रमुख थांबे:
कोपरगाव, मनमाड, औरंगाबाद, परभणी, परळी वैजनाथ, बीदर, सिकंदराबाद, गुडूर, रेणिगुंटा यासह एकूण २८ स्थानकांवर थांबे
हिंदू श्रद्धाळूंसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, जिथे श्री साईबाबा आणि श्री वेंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन एका प्रवासात शक्य होणार आहे. रेल्वेच्या या उपक्रमामुळे दक्षिण व पश्चिम भारतातील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
Comments are closed.