NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अरेरे ! निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळला; 17 कामगारांचा मृत्यू

0

ऐझवाल/एनजीएन नेटवर्क

मिझोराममध्ये आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून किमान 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे. मिझोरमची राजधानी आयजोल पासून 21 किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये हा अपघात झाला.

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधील गर्डर 341 फूट पडला.पुलामध्ये एकूण 4 खांब आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधला गर्डर खाली पडल्याने हा अपघात झाला. या गर्डरनर हे सर्व मजूर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची 104 मीटर म्हणजेच 341 फूट आहे. म्हणजेच पुलाची उंची कुतुबमिनारपेक्षा जास्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.