उत्तराखंड/एनजीएन नेटवर्क
नमामि गंगे प्रकल्पावर विजेचा धक्का लागून सोळा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यात समोर आली आहे. या घटनेने लोकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चमोली घटनेवर दु:ख व्यक्त करीत घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार मृतांमध्ये पाच पोलिसांचाही समावेश आहे. पण प्रशासनाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चमोली जिल्हयातील अलकनंदा नदी किनाऱ्यावर नमामि गंगे प्रोजेक्टचं काम सुरु आहे. या ठिकाणी विद्युत पुरवठ्यासाठी असलेला ट्रान्सफॉर्मर आज सकाळी अचानक फुटला. यामुळे काही विद्युत पुरवठ्याच्या संपर्कात आले आणि गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेत एका पोलीस सब इन्स्पेक्टरसह पाच होमगार्डचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
.. असा आहे प्रकल्प..
गंगा नदीतले प्रदूषण संपवण्यासाठी आणि नदी पुर्नजिवीत करण्यासाठी नमामि गंगे प्रोजेक्ट सुरु करण्याता आला आहे. गोमुखपासून हरिद्वारपर्यंत गंगी नदी 405 किलोमीटर अंतर वाहते. यादरम्यान नदी किनारे वसलेली 15 शहरे आणि 132 गावातील कचरा आणि करोडो लीटर सांडपाणी गंगेत सोडला जातो. त्यामुळे गंगा नदीत प्रदुषण वाढलं आहे. हे प्रदुषण रोखण्यासाठी 2017 पासून उत्तराखंडमध्ये गंगेच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणजे नमामि गंगे प्रोजेक्ट आहे.