NGN News
Latest Marathi News

कृषी महोत्सव रोजगार मेळाव्यात 1550 युवक सहभागी; 110 जणांना रोजगार  

  • आबासाहेब व चंद्रकांत दादा मोरे यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 1550 युवकांनी सहभागी होऊन मुलाखती दिल्या तर त्यापैकी 110 जणांना विविध कंपन्याच्या माध्यमातून नोकरीचे नियुक्ती पत्र आबासाहेब व चंद्रकांत दादा मोरे यांचे हस्ते देण्यात आले.

युथ फेस्टिवल मैदानात 23 जानेवारी पासून सुरु असलेल्या जागतिक कृषी मेळाव्यात आज सकाळी चंद्रकांत दादा मोरे, आबासाहेब मोरे, अजय बोरस्ते, विशाल संगमनेरे, निरंजन मोहिते, आशिष राऊत यांचे हस्ते दीपपूजन करून रोजगार मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्यभरातून नोकरीसाठी इच्छुक तरुण, तरुणी व त्यांचे पालक यांनी मुख्य सांभामंडपात गर्दी केली होती. चंद्रकांत मोरे यांनी यानिमित्त सांगितलं की श्री स्वामी समर्थ सेवामार्ग समाजासाठी उपयुक्त असे विविध उपक्रम राबवित असून बेरोजगार युवकांना अपेक्षित रोजगार मिळवून  देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशीलअसून आजचा रोजगार मेळावा या हेतूनेच आयोजीत केला आहे. इच्छुकांनी समर्थ केंद्राच्या संपर्कात राहून विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा “

60 कंपन्या, बँका सहभागी

आजच्या मेळाव्यात एडिमॅक्स, श्रीपाद, बा व्ही. जि, बॉश, एल आय सी, महेंद्र, एच डी एफ सी, कोटक, टाटा, एस बी आय, सिन्युमेरो, निलाचल, बजाज, सी टी आर अश्या विविध 60 कंपनी, बँकानी सहभागी होऊन पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन नियुक्ती दिली तर काही उमेदवारांना पुढील मुलाखती साठी पुन्हा बोलावण्यात येईल असे सांगितले.

Comments are closed.