नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध दिल्ली पोलिसांनी 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी केलेल्या एफआयआरनंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण आणि स्टॉकिंगचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपपत्रावर 22 जूनला सुनावणी होणार आहे.
या आरोपपत्रातील सहापैकी तीन तक्रारींबाबतचे व्हिडिओ देखील जोडण्यात आले आहेत. इतर आरोपांमध्ये फोटो पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहेत. 70 ते 80 लोकांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले गेले. यातील 22 जणांचा जबाब हा आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. या 22 जबाबातील 12 ते 15 जबाब हे कुस्तीपटूंचेच आहेत.
यातील भारतीय कुस्ती महासंघासोबत काम केलेले तर काही काम करत असलेल्या कुस्तीपटूंचा समावेश आहे. कुस्तीपटूंव्यतिरिक्त यात प्रशिक्षक, पंच आणि स्पर्धेदरम्यान संघासोबत प्रवास करणाऱ्या इतर लोकांचाही समावेश आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलाना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपपत्रात सर्व सहा महिलांच्या तक्रारी या वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहे. प्रत्येक तक्रारीबाबचा व्हिडिओ, फोटो आणि कॉल रेकॉर्ड्स पुरावा म्हणून आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत.