NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नांदुरमध्यमेश्वर धरणाच्या १० वक्राकार गेटसाठी मिळणार १५० कोटी निधी

0

पिंपळगाव (ब)/विशेष प्रतिनिधी

निफाड तालुक्यात गोदावरी नदीला पावसाळ्यात येत असलेल्या महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नांदुरमध्यमेश्वर धरणास उर्वरीत अतिरिक्त १० वक्राकार गेट बसविणेकामी आवश्यक निधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्य शासनाकडुन उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.

आज निफाड विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी निधी मिळणेकामी पाठपुरावा करणेकरीता आमदार दिलीपराव बनकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. यात निफाड तालुक्यातील विविध प्रश्न दादांकडे मांडले. त्यात प्रामुख्याने नांदुरमध्यमेश्वर धरणास १० वक्राकार गेट बसविणेबाबतचा प्रश्न होता. निफाड तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील करंजवण, पालखेड, वाघाड, गंगापुर, दारणा, ओझरखेड आदी विविध लहान – मोठ्या धरणामधुन पावसाळ्यात सोडण्यात येणाऱ्या पुर पाण्यामुळे गोदावरी नदी व कादवा नदीला महापुर येतो. नांदुर मध्यमेश्वर धरणातून धरण क्षमतेपेक्षा जास्त येणारे पुर पाणी वाहुन जाऊ शकत नसल्याने तालुक्यात पुर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील अनेक गांवातील नागरीकांचे, घरांचे, जनावरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे टाळण्यासाठी नांदुरमध्यमेश्वर धरणास उर्वरीत अतिरिक्त १० वक्राकार गेट बसविणेबाबतचा प्रस्तावास तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी तत्वत: मान्यता दिलेली असुन सदर प्रस्ताव अंतिम सुधारीत मान्यता मिळणेकामी शासन स्तरावर प्रलंबित असुन तो मंजुर करुन याकामासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन देणेबाबत मागणी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आधी केलेल्या कामाची व सन २००६च्या व सन २०१९मध्ये आलेल्या महापुराची आठवण देत सदर कामासाठी आवश्यक असलेला निधी मी स्वत: पुढाकार घेऊन उपलब्ध करुन देईल असे आश्वासन दिले. त्यानुसार संबंधित अधिकारी वर्गास तात्काळ सुचना देत कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याची माहीती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.