घोटी/राहुल सुराणा
देवगाव ग्रामपंचायत हादीतील पाराचाआंबा येथील वस्तीमधील कार्तिक शिवराम वारे या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू देह हा नाशेरा नदीमध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. सदर मुलाने दीड वर्षांपूर्वी शाळा सोडल्याचे सांगितले जात आहे.
आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे म्हणुन शेळी पालन करताना जात असत. या भागात अतिरिक्त पाऊस पडत असल्याने तो पाण्यात पडून वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीचे मत आहे. सदर मृतदेह हा तीन दिवसांनी मिळून आला आला आहे. दरम्यान श्रमजीवी संघटनेने सदर कुटुंबासाठी शासकीय भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
@दुर्गम ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता व जंगल व नद्या नाल्ये यातून आज पर्यंत अनेक लोक मृत झाले शासनाने सदर कुटुंबासाठी मदत करणे गरजेचे आहे.
– भगवान डोके, तालुकाध्यक्ष श्रमजीवी संघटना