धुळे/एनजीएन नेटवर्क
ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात आधी पाच जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. या अपघातात आता मृतांची संख्या वाढली असून आता मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. अपघात काहीजण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्यानं अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.