- गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये स्री रोगतज्ज्ञ डॉ. श्रीधर दायमा यांची कौशल्यपूर्ण कामगिरी
लासलगाव : राकेश बोरा
येथील गोविंद कृपा हॉस्पिटलमध्ये एका मध्यमवर्गीय गरीब महिलेस रक्तस्राव व लघवीचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी दाखल करण्यात आले. तपासणीनंतर तिच्या गर्भपिशवीत गंभीर समस्या आढळल्याने गर्भपिशवी काढण्याचे ठरवण्यात आले. मात्र तपासणी दरम्यान डॉक्टरांच्या लक्षात आले की गर्भपिशवीजवळ तब्बल २० सेंटीमीटर लांबीचा आणि अडीच ते तिन किलो वजनाचा गाठ (फायब्रॉईड) तयार झाला आहे.
या एवढ्या मोठ्या गाठीमुळे नेहमीच्या सिझरिंग पद्धतीने ऑपरेशन करणे धोकादायक होते. यावेळी स्री रोगतज्ज्ञ डॉ. श्रीधर दायमा यांनी आधुनिक लॅप्रोस्कोपीक हिस्टरेक्टोमी पद्धतीचा अवलंब करत गाठीला बारीक धाग्यांत रूपांतरित करून १२ फूट लांबीचा भाग शरीरातून बाहेर काढण्यात यश मिळवले.
सदर ऑपरेशन सुमारे अडीच तास चालले असून 2D तंत्रज्ञानाच्या मदतीने ते यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. सध्या रुग्णाची तब्येत स्थिर असून कोणताही धोका नाही. या यशस्वी ऑपरेशनमुळे हॉस्पिटलमधील वैद्यकीय तज्ञांच्या कौशल्याचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे. ग्रामीण आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी ही एक आश्वासक बाब ठरत आहे.
Comments are closed.