नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक जिल्हा परिषदेच्या 1038 जागांसाठी तब्बल 64,080 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर तब्बल पाच कोटी रुपयांचे चलन जमा झाल्याची तसेच 20 संवर्गातील भारती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भातील जाहिरात ही 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यांनतर अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. जवळपास 20 दिवसांत अर्ज भरण्याच्या मुदतीत 64 हजार 80 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर यासाठी 900 रुपयांचे चलन होते, त्यानुसार जवळपास 5 कोटी 75 लाख 43 हजार 100 रुपयांचे चलन जमा झाले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.