NGN News
Latest Marathi News

‘एसएमबीटी’ मध्ये तीन महिन्यांत पावणेदोन लाख रुग्णांवर यशस्वी उपचार

  • आरोग्यसाधना शिबिरास एक महिन्याची मुदतवाढ
  • ८ हजार ७९९ रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार
  • ३ हजार ६६० क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्रक्रिया
  • १ हजार १२७ हृदयविकार शस्रक्रिया
  • १४५ बायपास (Open Heart) शस्रक्रिया

नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क
घरात एखादी व्यक्ती आजारी पडली की कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती आणि उपचारांच्या गुणवत्तेची खरी परीक्षा सुरू होते. शासकीय रुग्णालयात वेटिंग, तर खासगीत वाढता खर्च या दोन्हीमध्ये रुग्ण गोंधळतो. अशा वेळी परवडणारा आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणारे ठिकाणच खरा दिलासा देत असते. अशाच विश्वासामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रुग्ण एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून चालू असलेले आरोग्यशिबिर यंदाही उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. तीन महिन्यांत पावणे दोन लाख रुग्णांवर उपचार आणि चार हजारांहून अधिक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. यातील बहुतांश शस्त्रक्रिया महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. रुग्णांच्या वाढत्या प्रतिसादामुळे शिबिरास मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शिबिरातील लाभ रुग्णांना दिले जातील अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली.  

आरोग्यसाधना शिबिरात रुग्णांच्या सर्व आजारांची तपासणी, उपचार आणि विविध शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत. प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायी जीवन जगता यावे. तसेच कुठलीही व्यक्ती आरोग्य सेवा, सुविधा यापासून वंचित राहू नये, हाच एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित आरोग्यसाधना शिबीराचा मुख्य उद्देश आहे. सरकारी योजनांमध्ये न बसणाऱ्या शस्त्रक्रियादेखील अल्पदरांत उपलब्ध करून देण्यात आल्याने आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांनी केवळ नाममात्र दरात असलेली औषधे आणि इतर तपासण्यांच्या खर्चात उपचार केले.  यावर्षी रुग्णालयाकडून अनोख्या योजनेची घोषणा करण्यात आली होती यामध्ये रुग्णांसाठी ऑपरेशन चार्जेस, डॉक्टर चार्जेस, नर्सिंग चार्जेस,  हॉस्पिटल चार्जेस, भूलतज्ञ चार्जेस व जेवण पूर्णपणे मोफत करण्यात आले. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रुग्णांनी या योजनेचा फायदा घेत उपचार करून घेतले.  

हॉस्पिटलच्या वतीने १ जुलै ते ३०  सप्टेंबर आरोग्यसाधना शिबिराचा ३ महिन्यांत तब्बल १ लाख ५४ हजार २८९ रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये ८ हजार ७९९ रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार करण्यात आले. तर ३ हजार ६५७ रुग्णांवर क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे, हृदयविकार विभागात १ हजार १२७ हृदयविकार शस्रक्रिया, १४५ बायपास (Open Heart Surgery) शस्रक्रिया झाल्या आहेत.  एसएमबीटी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर २४ तास उपलब्ध होते. येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी नागपूर, भंडारा, अमरावती, गोंदिया, जालना, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाले आहे. समृद्धी महामार्गासाठी ठरवून दिलेल्या वेगाचा खऱ्या अर्थाने विदर्भ आणि मराठवाड्यातील रुग्णांना फायदा झाला आहे.

हृदयरोग व हृदयविकार, बालरोग व बालहृदयरोग, कर्करोग, किडनीविकार, मुत्रविकार, मेंदू व मणकेविकार, सांधेरोपण गुडघा व खुबा प्रत्यारोपण, क्रिटिकल केअर मेडिसीन, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी, पक्षाघात (स्ट्रोक), प्लास्टिक सर्जरी, जन्मजात आजार, अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग, दंतरोग, कान-नाक-घसा, त्वचा याबरोबरच गुप्तरोग, श्वसन रोग, मानसोपचार, आहार आणि पोषण, अपघात, फिजिओथेरेपी इत्यादी आजारांच्या उपचारांसाठी मोठ्या संख्येने एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.

गेल्या तीन महिन्यांत औरंगाबाद येथून अनेक रुग्णवाहिका अवघ्या दीड तासांत एसएमबीटी हॉस्पिटल दाखल झाल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचविण्यात यश आले आहे एसएमबीटी हॉस्पिटलवर रुग्णांचा प्रचंड विश्वास असून तळागाळातील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दररोज दाखल असल्यामुळे रुग्णसंख्या कमालीची वाढलेली दिसून येत आहे.

——–
प्रत्येकासाठी दर्जेदार आरोग्यसेवा – आमचा मूलमंत्र
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक आरोग्यसेवा देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरी परतावा, यासाठी आमचा प्रयत्न असतो. आमच्याकडे अत्याधुनिक, मिनिमली इन्व्हेसिव्ह (Minimally Invasive) तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक शस्त्रक्रिया केल्या जातात. यामुळे रुग्णांना कमी टाके, कमी रक्तस्राव, कमी वेदना आणि जलद डिस्चार्ज मिळतो. या काळात हजारो रुग्णांवर उपचार करून आमचे डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचारी अहोरात्र निःस्वार्थपणे सेवा देत आहेत. त्यांच्या समर्पित सेवेसाठी मन:पूर्वक आभार आणि कौतुक व्यक्त करते.
डॉ. मीनल मोहगांवकर, अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल

———-
मेंदू आणि मणकेविकारांत वाढ
अलीकडच्या काळात मेंदू आणि मणक्यांशी संबंधित विकार झपाट्याने वाढताना दिसत आहेत. वाढलेला ताण, अनियमित जीवनशैली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे कमी वयातही गंभीर आजार उद्भवत आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी उपचार मिळत आहेत. अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोपमुळे आता अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही सुरक्षितपणे पार पाडल्या जात आहेत.
डॉ. हितेंद्र गडकरी, मेंदू आणि मणकेविकार तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल
 
——-
सर्व प्रकारच्या कॅशलेस सेवा उपलब्ध
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता माजी व कार्यरत केंद्रीय कर्मचारी (CGHS & ECHS), आयएसपी (ISP), सीएनपी(CNP) तसेच एमएसईबी (MSEB) कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच नामांकित इन्शुरन्स धारकांनादेखील याठिकाणी एकाच छताखाली २६ वेगवेगळ्या विभागांच्या सेवांचे उपचार कॅशलेश पद्धतीने घेता येणार आहेत.  
सचिन बोरसे, सीओओ, एसएमबीटी हॉस्पिटल

——–
गेल्या तीन महिन्यात ३ हजार ६६० शस्रक्रिया
अस्थिरोग शस्रक्रिया, पूर्ण गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (TKR), पूर्ण खूबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (THR), मणक्याच्या शस्रक्रिया, सांध्याची दुर्बीणीद्वारे शस्रक्रिया (Arthroscopy), जनरल शस्रक्रिया, मेंदू व मणके विकार शस्रक्रीया, तोंडाच्या शस्रक्रिया, कर्करोग शस्रक्रिया, प्लास्टिक शस्रक्रिया, मूत्रविकार शस्रक्रिया, नेत्ररोग शस्रक्रिया, कान-नाक-घसा शस्रक्रिया, स्रीरोग शस्रक्रिया, बायपाससह एकूण ३६६० शस्रक्रिया व मोफत ४५० पेक्षा अधिक प्रसूतीदेखील याठिकाणी झाल्या आहेत.

Comments are closed.