- न्याय्य, पारदर्शक आणि अचूक मतदार यादीची मागणी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 मधील मतदार यादीत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. यामध्ये दुबार नावे, इतर प्रभागातील नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गोंधळामुळे नागरिकांच्या मतदान हक्कावर मोठा परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकत्र येऊन न्याय्य, पारदर्शक आणि अचूक मतदार यादीची मागणी करत आज नाशिक महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अशोक साताळकर यांना निवेदन सादर केले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी नगरसेवक राहुल दिवे, आशाताई तडवी, सुमन अहोळ, विजय ओहोळ, अनिलभाई गांगुर्डे, अनिल जोंधळे, प्रवीण नवले, पुजा नवले, दिलीप प्रधान, प्रवीण दारुणकर, रफिक तडवी, मुन्ना तडवी, बाबा पवार, गौरव केदारे, तुषार सोनकांबळे, प्रवीण पाटील, मनीष डांगे, फहीम शेख, शशांक शिंदे, उमेश निकम, निखिल लोखंडे, बाबा लोखंडे, समीर गांगुर्डे, अमोल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.