NGN News
Latest Marathi News

तरुणींना हॉटेलमध्ये डांबून शरीरसुखाची मागणी; निवृत्त पोलीस अधिकारीपुत्राचा प्रताप

अवैध धंदा केल्यास भरपूर पैसे देण्याचे आमिष; पोलिसांकडून बेड्या

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

एका व्यावसायिक छायाचित्रकार तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबून ठेवत बंदुकीच्या धाकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला आहे. हॉटेलचालक हा निवृत्त पोलीस उपाधीक्षकाचा मुलगा असून याआधी दोनदा पोलीस छापा पडूनदेखील त्याचे उद्योग बिनदिक्कतपणे सुरु असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सौरभ देशमुख असे हॉटेल चालकाचे नाव असून पंचवटीच्या म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर त्याचे कॅटल हाउस नामक हॉटेल आहे. हुक्का पार्लरसह अवैध व्यवसायांसाठी हॉटेलचा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यानुसार छापे पडूनही ते उद्योग पुन्हा सुरु होत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. अलीकडील घटनेत सौरभ याने एका व्यावसायिक छायाचित्रकार तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्यांच्याकडून शरीरसुखाची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यासाठी त्याने दोघींना बंदुकीचा धाक दाखवला. हॉटेलमध्ये येऊन अवैध धंदा केल्यास भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवण्याचाही त्याने प्रयत्न केला. हॉटेलमधील वेटरकडे बाकी असलेले पैसे घेण्यासाठी आपल्या एका मित्रासोबत या दोघी तरुणी गेल्या असता त्यांच्यावर हा प्रसंग उद्भवला.

कॉलगर्ल म्हणून काम करण्याचे आमिष..

सौरभ याने दोन्ही तरुणीसह त्यांच्यासमवेत असलेल्या तरुणाला शिवीगाळ करीत बंदुकीचा धाक दाखवला. शिवाय, येथे कॉलगर्ल म्हणून काम केल्यास भरपूर पैसे देण्याचे आमिष दाखवले. दोघींकडे शरीरसुखाची मागणी करताना, आपले वडील पोलीस अधिकारी होते, त्यामुळे आपले कोणी वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देत तिघांना डांबून ठेवले. पहाटेच्या सुमारास त्याने तिघांजाळील रोकड काढून सोडून दिले. या तिघांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सौरभ याच्यासह त्याचा साथीदार मोहित ताम्हणे यालाअटक केली आहे. सौरभ हा निवृत्त पोलीस उपाधीक्षक संजय देशमुख यांचा मुलगा असल्याचे कळते.

Comments are closed.